Hi! Welcome Back and Stay Tune! MNS Morcha Against Railway – Raj Thackeray Full Speech 5 October 2017. VIRAL Speech - Mukah Pages : Media Marketing Make Easy With 24/7 Auto-Post System. Find Out How It Was Done!

Header Ads

MNS Morcha Against Railway – Raj Thackeray Full Speech 5 October 2017. VIRAL Speech

For More Videos SUBSCRIBE to our YouTube Channel
*** http://bit.ly/SUBSCRIBE-ViralVideosIndia ***
———————————————————————————
■ Watch More Videos- http://bit.ly/ViralVideosIndia ■

आज रेल्वे मुख्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विराट अशा संताप मोर्चानंतर मा.राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मांडलेले महत्वाचे मुद्दे :
१) मेट्रोला भेटू असं म्हटलं पण मला भीती ही की मेट्रोच्या ऐवजी तुम्ही मित्रो असं ऐकलं असतं तर कदाचित तुम्ही आला नसता.
२) मध्य रेल्वे-पश्चिम रेल्वेवरचे फेरीवाले १५ दिवसाच्या आत उठवा नाही तर १६ व्या दिवशी माझे सहकारी त्यांना उठवतील आणि मग संघर्ष झाला तर त्याला रेल्वेप्रशासन-सरकार जबाबदार असेल.
३) देश म्हणजे मजाक वाटला का? कुणी स्फोटात मरतं, कुणी खड्ड्यात मरतं, कुणी पुलावर मरतं, कुणी रेल्वेखाली मरतं. किड्या-मुंग्यांसारखी माणसं मरतायत आणि यांच्या उच्चस्तरीय बैठका काय करायच्या?
४) महिलांसाठी गाड्या वाढवा सांगितलं तर अधिकारी लिहून घेत होते जसं आम्ही काही नवं सांगितलं, तुम्हाला इतकेही नाही कळत?
५) ज्या कुटुंबाचा सदस्य रेल्वेने प्रवास करतोय त्या कुटुंबात सतत धाकधूक असते की हा गेलेला माणूस परत येईल की नाही.
६) रेल्वेच्या समस्या नव्या नाहीत, किती वेळा लोकांनी मांडल्या पण शासन-प्रशासन ढिम्म.
७) आजचा मोर्चा हा रेल्वेपुरता मर्यादित नाही सरकार बदललं तरी परिस्थिती जैसे थे म्हणून माझा संताप आहे.
८) रेल्वेपुलावर झालेली ती चेंगराचेंगरी पाहवत पण नव्हती, काय दयनीय परिस्थिती करून ठेवलीय देशाची. कुणाकडे आता आशा लावून बसायचं आम्ही?
९) मोदींवर माझ्यासकट या देशाने विश्वास टाकला, देशाने संपूर्ण सत्ता दिली पण तुम्ही विश्वासघात केलात म्हणून माझा संताप आहे.
१०) नितीन गडकरी म्हणतात अच्छे दिन हे घश्यात अडकलेलं हाडूक आहे त्याचा आम्हालाच त्रास होतोय म्हणजे काय तर अच्छे दिन येणारच नाहीत!
११) मोदी सरकार परदेशातून पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार होते त्यावर अमित शाह म्हणतात ‘वो तो एक चुनावी जुमला था’.
१२) रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही. कर्जमाफी दिली तर देश खड्ड्यात जाईल. म्हणजे ज्या शेतकरी कर्जमाफीच भांडवल करून सरकार आणलं ते हे सरकार कर्जमाफी देणार नाही.
१२) उर्जित पटेलांच दुसरं विधान काय तर देशात आर्थिक मंदी वाढणार म्हणजे काय तर असंख्य लोकांच्या नोकऱ्या जाणार.
१३) विकास वेडा झालाय हा घोषवारा खुद्द भाजपतर्फे काढण्यात आली तुम्हाला वाटेल इतर कुणी काढली असेल.
१४) सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढून टाकलं. जो तज्ञ यांच्याविरोधात मत मांडतो त्याला काढून टाकतात. मग फक्त २-३ माणसं देश चालवणार का? बाकीच्यांना काही कळत नाही का?
१५) मोदींनी घोषणा केल्या-केल्या बुलेट ट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले.
१६) मुठभर लोकांसाठी बुलेट ट्रेन आणि १.१० लाख कोटींच कर्ज देश फेडणार!
१७) मोदींच मुख्यमंत्री असतानाच एक भाषण आहे; ती चित्रफित आता फिरतेय सगळीकडे. काय म्हणालेत महाशय त्यात तर “मुंबई-अहमदाबाद बुलेटट्रेन शुरू करते है | उस बुलेटट्रेनमे बैठेगा कोई नही लेकीन दिखा तो सकते है |”
१८) देशातले सर्व प्रश्न माहित होते असा यांचा दावा मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत?
१९) नोटबंदीसारखी धोरणं, वस्तूव सेवा कराची लगीनघाई, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत, योगाप्रयोग यांच्या जाहिराती हे सर्व करत बसला आणि देश खड्ड्यात नेलात.
२०) देशातल्या घराघराचा कानोसा घ्या जरा; लोकं या सरकारला भयंकर शिव्या घालताहेत.
२१) सर्व संविधानिक संस्थांना माझी विनंती आहे की सरकारच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका, सरकारं बदलत असतात.
२२) सर्व संपादकांना-पत्रकारांना माझी विनंती आहे की या सरकारला वठणीवर आणा.
२३) मोर्चाचं प्रसारण दाबलं जातंय पण यांना माहित नाही वाटत की तुमच्या विरोधाचा सूर्य आता उगवणारच.
२४) आजचा मोर्चा शांततेत काढलाय; ऐकलत तर ठीक नाही तर पुढचं पाऊल शांततेत नसेल.
२५) ज्या रेल्वेपुलावरील चेंगराचेंगरीत जी लोकं दगवलीत त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.

व्हिडिओ क्रेडिट – मनसे अधिकृत टीम.
व्हिडिओ पब्लिशर – ©VIRAL VIDEOS INDIA.



✍ Sumber Pautan : ☕ Get Viral Clicks

Kredit kepada pemilik laman asal dan sekira berminat untuk meneruskan bacaan sila klik link atau copy paste ke web server : http://ift.tt/2z7ugjm

(✿◠‿◠)✌ Mukah Pages : Pautan Viral Media Sensasi Tanpa Henti. Memuat-naik beraneka jenis artikel menarik setiap detik tanpa henti dari pelbagai sumber. Selamat membaca dan jangan lupa untuk 👍 Like & 💕 Share di media sosial anda!


No comments

Comments are welcome and encouraged on this site. Comments deemed to be spam or solely promotional will be deleted. Including link to relevant content is permitted, but comments should be relevant to the post topic.

Comments including profanity and containing language that could deemed offensive will also deleted. Please respectful toward other contributors. Thank you.